मध्य रेल्वेच्या ‘मिशन ३००० एमटी’ला चालना; ट्रॅक्शन सिस्टम अपग्रेडेशनमध्ये मोठी झेप

मध्य रेल्वेच्या आधुनिकीकरणाला वेग देत सोलापूर विभागाने भारतीय रेल्वेच्या १×२५ kV ते २×२५ kV ऑटो-ट्रान्सफॉर्मर फीडिंग सिस्टम अपग्रेडेशन प्रकल्पांतर्गत मोठी कामगिरी केली आहे. मुंबई-चेन्नई सुवर्ण चतुर्भुज मार्गावरील या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा भाग म्हणून गौडगाव ट्रॅक्शन सब-स्टेशन (TSS) साठी प्राप्त झालेल्या पहिल्या स्कॉट ट्रान्सफॉर्मरच्या कमिशनिंग प्रक्रियेची सुरुवात यशस्वीरीत्या झाली.
मध्य रेल्वेच्या ‘मिशन ३००० एमटी’ला चालना; ट्रॅक्शन सिस्टम अपग्रेडेशनमध्ये मोठी झेप
मध्य रेल्वेच्या ‘मिशन ३००० एमटी’ला चालना; ट्रॅक्शन सिस्टम अपग्रेडेशनमध्ये मोठी झेप
Published on

सोलापूर : मध्य रेल्वेच्या आधुनिकीकरणाला वेग देत सोलापूर विभागाने भारतीय रेल्वेच्या १×२५ kV ते २×२५ kV ऑटो-ट्रान्सफॉर्मर फीडिंग सिस्टम अपग्रेडेशन प्रकल्पांतर्गत मोठी कामगिरी केली आहे. मुंबई-चेन्नई सुवर्ण चतुर्भुज मार्गावरील या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा भाग म्हणून गौडगाव ट्रॅक्शन सब-स्टेशन (TSS) साठी प्राप्त झालेल्या पहिल्या स्कॉट ट्रान्सफॉर्मरच्या कमिशनिंग प्रक्रियेची सुरुवात यशस्वीरीत्या झाली.

गौडगाव TSS येथे १२० टन वजनाच्या स्कॉट ट्रान्सफॉर्मरची रेल्वे ट्रॅकवरून केलेली क्रॉसिंग प्रक्रिया अत्यंत जटिल असूनही ४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२:३० ते ३:१५ या वेळेत सुरळीत पार पडली. या प्रक्रियेत ९५/१०० एमव्हीए क्षमतेचा स्कॉट ट्रान्सफॉर्मर असलेला पुलर–ट्रेलर सुरक्षितरीत्या ट्रॅक ओलांडण्यात यशस्वी ठरला, तर १२.३ एमव्हीए क्षमतेचे ४ ऑटो ट्रान्सफॉर्मर वाहून नेणारे ट्रक्सदेखील सुरक्षितरीत्या पुढे गेले. या संपूर्ण ऑपरेशनदरम्यान इलेक्ट्रिकल TRD, इलेक्ट्रिकल कन्स्ट्रक्शन, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागांचे वरिष्ठ अधिकारी व तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते. गौडगाव लूप लाईनवर आवश्यकतेनुसार तांत्रिक सहाय्यासाठी एक टॉवर वॅगन तैनात करण्यात आला होता. याशिवाय, २४ कामगार, ६ फ्लॅगमन, २ एक्स्कॅव्हेटर्स, २ पुलर, १ रोलर आणि १ पॉवर पॅक यांच्या समन्वयातून ही प्रक्रिया वेळेत आणि सुरक्षितरीत्या पूर्ण करण्यात आली.

ट्रॅक्शन सिस्टम म्हणजे रेल्वे इंजिनला शक्ती व गती प्रदान करणारी संपूर्ण यंत्रणा होय. यात ट्रॅक्शन मोटर्स, पॉवर सप्लाय, कंट्रोल सिस्टम, ट्रान्सफॉर्मर्स व कन्व्हर्टर्स यांचा समावेश होतो. या यशस्वी अपग्रेडेशनमुळे मध्य रेल्वेच्या भविष्यातील उच्च वेग आणि उच्च वहनक्षमता या दोन्ही महत्त्वाच्या उद्दिष्टांना मोठी चालना मिळणार आहे.

गौडगाव हे पहिले स्थानक

मध्य रेल्वेमधील हा पहिला स्कॉट ट्रान्सफॉर्मर असून दौंड-सोलापूर आणि सोलापूर-वाडी विभागासाठी उभारण्यात येणाऱ्या ६ सब-स्टेशन्सपैकी गौडगाव हे पहिले स्थानक ठरले आहे. १×२५ kV वरून २×२५ kV प्रणालीमध्ये अपग्रेडेशन झाल्याने विभागीय वेग १६० किमी प्रतितासपर्यंत वाढणार आहे. ‘मिशन ३००० एमटी’ अंतर्गत मालवाहतूक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून सुवर्ण चतुर्भुज मार्गावरील ऑपरेशनल क्षमता व विश्वासार्हतेत मोठी सुधारणा अपेक्षित आहे. उच्च क्षमतेच्या ट्रेन ऑपरेशन्ससाठी हे अपग्रेडेशन निर्णायक ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in