

मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई ते नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडी रोड तसेच पुणे ते नागपूर आणि एलटीटी ते नागपूर दरम्यान २४ विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कोल्हापूर आणि सीएसएमटी या गाडीच्या ६ विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत. ट्रेन क्रमांक ०१०२९ विशेष गाडी १३, १८ आणि २० फेब्रुवारीला सीएसएमटी येथून दुपारी २.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१०३० विशेष गाडी १४, १९ आणि २१ फेब्रुवारीला श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून दुपारी ३.५५ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता पोहोचेल, तर सीएसएमटी ते सावंतवाडी रोड ते सीएसएमटी या गाडीच्या ६ विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत.
ट्रेन क्रमांक ०११२९ विशेष १४, १९ आणि २१ फेब्रुवारीला सीएसएमटी येथून रात्री १२.२० वाजता सुटेल व सावंतवाडी रोड येथे दुपारी १२.३० वाजता पोहोचेल, तर ट्रेन क्रमांक ०११३० विशेष १४, १९ आणि २१ रोजी सावंतवाडी रोड येथून संध्याकाळी ५.२० वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे पहाटे ४.०५ वाजता पोहोचेल.