अहमदनगर विसरा, आता अहिल्यानगर म्हणा! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मंजुरी

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची नामांतरणाची स्थानिकांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.
अहमदनगर विसरा, आता अहिल्यानगर म्हणा! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मंजुरी
Published on

मुंबई : अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर असे नामकरण करण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने मान्यता दिल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.

अहमदनगरचे नामकरण करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मार्च २०२४ मध्ये घेतला आणि तो केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.  त्यापूर्वी गेल्या वर्षी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी (ता.जामखेड) येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी अहमदनगरचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे करण्याची घोषणा केली होती.

महाराणी पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर या १८ व्या शतकातील इंदूरच्या (मध्य प्रदेश) राज्यकर्त्या होत्या. अहिल्याबाई होळकर या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील होत्या.

अहमदनगरच्या नामांतराची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. तथापि, सरकारने यापूर्वी औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामकरण धाराशीव असे केल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर असे नामकरण करण्याच्या मागणीने जोर धरला होता. आता राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची नामांतरणाची स्थानिकांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in