राज्यात काही ठिकाणी पुढील २४ तासांत पावसाची शक्यता

अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात हलक्या पावसाच्या सरी बरसू शकतात, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
राज्यात काही ठिकाणी पुढील २४ तासांत पावसाची शक्यता

नवी दिल्ली : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात हलक्या पावसाच्या सरी बरसू शकतात, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. तर, छत्रपती संभाजीनगरला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टबर्न्स आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव, यामुळे पुढील आठवड्यात राज्यातील तापमानात घट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात ५ फेब्रुवारीपासून तापमानात घट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. किमान तापमान सुमारे चार अंश सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे. सोमवारनंतर हवामान कोरडे आणि आकाश मुख्यतः निरभ्र राहील, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सचा देशाच्या हवामानावर परिणाम दिसून आला आहे. उत्तरेत थंडीचा जोर सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील राज्यात हवामानामध्ये कोरडेपणा वाढू लागल्याने महाराष्ट्रातही याचा परिणाम दिसायला लागला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांमध्ये महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता असून त्यानंतर पुढील आठवड्यात पुन्हा एकदा हुडहुडी भरविणारी थंडी पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यामुळे थंडी काहीशी कमी झाली होती. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी-जास्त होत आहे.

त्याशिवाय, उत्तर भारतात पुढील दोन दिवसांत जम्मू, काश्मीर, लद्दाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील प्रदेशांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in