पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

तामिळणाडूच्या किनावपट्टीवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे.
पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात गुरुवारी, तर शुक्रवारी राज्यभरात ढगांज्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावासाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तामिळणाडूच्या किनावपट्टीवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तसंच श्रीलंकेपासून बांग्लाच्या खाडीपर्यंत वाऱ्याची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही वातावरणीय प्रणालींमुळे गुरुवार २३ नोव्हेंबरपासून बंगालच्या उपसागरावरुन आग्नेय दिशेने राज्यात बाष्पयुक्त वारे येण्याची शक्यता आहे.

यामुळे गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी गोवा, कोकण आणि मध्ये महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. १४ नोव्हेंबर शुक्रवार रोजी राज्यभरात हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुढील दोन दिवस राज्यात दोन दिवस, बुधवारपर्यंत कोरडे वातावरण राहण्याची शक्यता असल्यामुळे दोन दिवस किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. २३ नोव्हेंबर गुरुवारी बाष्पयुक्त वारे राज्यात येणार असल्यामुळे पुढील चार-पाच दिवस राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होण्याची आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामना विभागाने व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in