राज्यात पावसाची शक्यता ; पुढील काही तासात 'या' जिल्ह्यात बरसणार सरी
पुढच्या काही तासात राज्यातील विविध जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवली जातं आहे. अशातच पावसाने मुंबईत देखील प्रवेश केला आहे. मुंबईत पावसाचे वातावरण निर्माण झालं आहे. मुंबईत देखील पावसाच्या सारी बरसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही ठिकाणी हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राज्य हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर जाताना छत्री किंवा रेनकोट घेऊन जावं, असा सल्ला देखील देण्यात येत आहे. हवामान विभागाने याप्रकरणी फेसबुक वर पोस्ट केली आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, व मुसळधार सरी बरसणार आहेत .
पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागान म्हटलं आहे. हवामान विभागाने वाढत्या वायू प्रदूषणाच्या कारणाबाबतही माहिती दिली आहे.