परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता ‘मिशन मोड’वर; उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचे बाटू विद्यापीठ प्रशासनाला निर्देश

राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना देश-विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार ठोस उपाययोजना करत आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांच्या परीक्षा आणि निकाल प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठोस पावले उचलली आहेत.
परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता ‘मिशन मोड’वर; उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचे बाटू विद्यापीठ प्रशासनाला निर्देश
Published on

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना देश-विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार ठोस उपाययोजना करत आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांच्या परीक्षा आणि निकाल प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठोस पावले उचलली आहेत. त्यानुसार प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश देऊन परीक्षा आणि निकाल प्रक्रिया ‘मिशन मोड’वर मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

बाटू विद्यापीठाकडून परीक्षांचे वेळापत्रक आणि गुणपत्रिका तसेच पदवी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी, संस्थाचालक आणि लोकप्रतिनिधींकडून होत आहेत. तसेच या सर्व कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे अनेक महाविद्यालये व संस्थाचालकांनी विद्यापीठापासून विसंलग्निकरणाचीही मागणी केली आहे. या सर्व शैक्षणिक बाबींची विचार करून प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी दिले असून परीक्षा आणि निकाल प्रक्रिया ‘मिशन मोड’वर मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती

परीक्षा सुधारणांचा दांडगा अनुभव असलेल्या प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती विद्यापीठात करण्यात आली आहे. राजेश अग्रवाल समितीसह विविध शासकीय समित्यांवर काम केलेले आहे. या अनुभवातून प्रभारी कुलगुरूंनी पुढील ३ ते ६ महिन्यांत सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे आणि विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in