चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात सहमती; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची यशस्वी मध्यस्थी

चंद्रपूर महापालिकेतील सत्ता वाटपावरून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात शनिवारी सहमती झाली. त्यानुसार चंद्रपूरचा महापौर हा धानोरकर यांच्या गटाचा तर स्थायी समितीचा अध्यक्ष हा वडेट्टीवार यांचा असणार आहे.
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात सहमती; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची यशस्वी मध्यस्थी
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात सहमती; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची यशस्वी मध्यस्थी
Published on

मुंबई : चंद्रपूर महापालिकेतील सत्ता वाटपावरून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात शनिवारी सहमती झाली. त्यानुसार चंद्रपूरचा महापौर हा धानोरकर यांच्या गटाचा तर स्थायी समितीचा अध्यक्ष हा वडेट्टीवार यांचा असणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत. यापैकी १३ नगरसेवक धानोरकर यांचे तर १४ नगरसेवक वडेट्टीवार यांचे नेतृत्व मानणारे आहे. अशातच धानोरकर यांनी १३ नगरसेवकांसह काँग्रेसच्या गटाची नोंदणी केली आहे. धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्या भांडणात चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर निवडून येण्याबाबत शंका व्यक्त केल्या जात होत्या.

प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांनी आज वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत चंद्रपूर मनपात काँग्रेसचा गटनेता ठरविण्याचा अधिकार सपकाळ यांना देण्यात आला.

परभणीत ठाकरे गटाला पाठिंबा : सपकाळ

दरम्यान, परभणी महानगरपालिकेत काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला पाठिंबा देत आहे. त्यामुळे चंद्रपूरमध्ये त्यांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा, यासाठी चर्चा सुरु असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये समन्वयात अडचण नाही, असा खुलासाही सपकाळ यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in