"उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच", चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सामनाला मुलाखती दिली आहे.
"उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच", चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

"उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच आहे", अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सामनाला मुलाखती दिली आहे. या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

"एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील माध्यमांच्या संपादकांना मुलाखत देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली. ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच.

उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत.

१. दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय ?

२. १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता ?, हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का ?

३. सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात ?

४. ⁠ राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात ?

५. उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता ?

उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान आहे की, हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत, महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत आहे.

जय महाराष्ट्र!

औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापणारे मराठे...

राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेल्यामुळे तुम्ही औरंगजेबाच्या विचाराने पुढे चालेला आहात? अशी टीका केली जात आहे? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, पाकिस्तानाच जाऊन नवाज शरीफचा केक खाणारी लोक, मला औरंगजबाचा फॅन म्हणून शकत नाही. औरंगजेब हा गुजरातमध्ये जन्मला होता. जसे हे दिल्लीत गेलेत तसा औरंगजेब आग्र्यात होता. महाराष्ट्र जिंकण्यासाठी औरंगजेब सुद्धा २७ वर्ष महाराष्ट्रात बसला होता. पण, तो पुन्हा आग्र्याला जाऊ शकला नव्हता. तेव्हा कदाचित औरंजेबाने सुद्धा रोड शो आणि सभा घेतल्या असतील. तेव्हा औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापणारे मराठे आज सुद्धा जिवंत आहेत. त्यांचे वंशज आज महाराष्ट्रात आहेत."

logo
marathi.freepressjournal.in