वास्तूशास्त्रातील तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची चाकूने भोसकून हत्या

हुबळी येथील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये थांबले होते. येथे आलेल्या दोन अनोळखी लोकांनी चाकूने भोसकून त्यांचा खून केला
वास्तूशास्त्रातील तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची चाकूने भोसकून हत्या

वास्तूशास्त्रातील तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या करण्यात आली आहे. ‘सरल वास्तू’ फेम चंद्रशेखर गुरुजी यांची कर्नाकमधील हॉटेलमध्ये चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. हुबळी जिल्ह्यात ही घटना घडली असून यानंतर एकच खळबळ उडाली आहे. चंद्रशेखर गुरुजी कामानिमित्त हॉटेलमध्ये आले होते असा पोलिसांचा अंदाज आहे.

सरल वास्तू फेम चंद्रशेखर अंगडी यांची मंगळवारी भरदिवसा हत्या करण्यात आली. ते हुबळी येथील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये थांबले होते. येथे आलेल्या दोन अनोळखी लोकांनी चाकूने भोसकून त्यांचा खून केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अंगडी यांना किम्स रुग्णालयात नेले, परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, बागलकोट येथील रहिवासी असलेल्या चंद्रशेखर यांनी कंत्राटदार म्हणून करिअरची सुरुवात केली होते. त्यांना मुंबईत नोकरी लागली आणि तिथेच स्थायिक झाले. पुढे त्यांनी तिथे वास्तू व्यवसाय सुरू केला होता.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in