चंद्रहार पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; आज होणार पक्ष प्रवेश

सांगली लोकसभा मतदारसंघात मविआ आघाडीत सांगलीवर काँग्रेस दावा सांगत होती, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना तुम्हाला कोल्हापूर सोडली असे सांगत सांगली मागत होती. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची नाराजी ओढवून घेत परस्पर आपला उमेदवार जाहीर केला.ज्या चंद्रहार पाटील यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आडमुठेपणा केला. तोच उमेदवार आता शिंदे शिवसेनेत चालला आहे.
चंद्रहार पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; आज होणार पक्ष प्रवेश
Published on

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात मविआ आघाडीत सांगलीवर काँग्रेस दावा सांगत होती, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना तुम्हाला कोल्हापूर सोडली असे सांगत सांगली मागत होती. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची नाराजी ओढवून घेत परस्पर आपला उमेदवार जाहीर केला. ज्या चंद्रहार पाटील यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आडमुठेपणा केला. तोच उमेदवार आता शिंदे शिवसेनेत चालला आहे. पैलवान चंद्रहार पाटलांनी रविवारी याची घोषणा केली आहे.

सोमवारी संध्याकाळी ५ वाजता ठाण्यातील नेहरू नगर परिसरात पक्षप्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे, खा. नरेश म्हस्के, खा. धैर्यशील माने, सांगलीतील स्थानिक आमदार सुहास बाबर, मंत्री उदय सामंत, मंत्री संजय शिरसाट, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री प्रताप सरनाईक हे नेते उपस्थितीत राहणार आहेत.

एकनाथ शिंदेंकडून चंद्रहार पाटलांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरील आमदारकीसंदर्भात चर्चा झाल्याचे कळते.

लोकसभेला काँग्रेसमधून बंडखोरी करून विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटलांना धुळ चारली होती. ठाकरेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतू, संपूर्ण काँग्रेस विशाल पाटलांच्या बाजुने गेली आणि चंद्रहार पाटलांच्या पराभवाचा निकाल लागला होता. तेव्हापासून चंद्रहार पाटील राजकारणापासून बाजुलाच होते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोकण दौऱ्यात चंद्रहार पाटील यांची शिंदेसेनेतील नेत्यांसह उपस्थिती दिसली होती. यावरून चंद्रहार पाटील आता शिवसेना शिंदे गटात जाणार, असे दावे राजकीय वर्तुळात होऊ लागले होते.

२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला प्रचंड मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले. यानंतर ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसले. संपूर्ण राज्यातून नेते, पदाधिकारी, हजारो कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करून शिवसेना शिंदे गटात गेले. ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात जाण्याचा सिलसिला अद्यापही सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.

logo
marathi.freepressjournal.in