ईव्हीएम मशीनमुळे मतांच्या आकड्यात बदल; संजय राऊत यांचा ईव्हीएमबाबत पुन्हा आक्षेप

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले, याबाबत नेमके कारण काय याचा शोध घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातून ठाकरे ब्रॅड संपवण्याचा भाजपचाच डाव आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत
संजय राऊत
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले, याबाबत नेमके कारण काय याचा शोध घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातून ठाकरे ब्रॅड संपवण्याचा भाजपचाच डाव आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

मविआच्या पराभवास नाना पटोले जबाबदार ठरवले जात आहे. एखाद्या व्यक्तीला जबाबदार ठरणे अयोग्य आहे, असेही संजय राऊत म्हणाले. ईव्हीएम मशीनमध्ये गडबड आहे हे नक्की. एकाच्या कुटुंबात ६५ मतदार तरी उमेदवाराला फक्त चार मते कशी मिळतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अपयशाची कारणे शोधली पाहिजेत. 

यंत्रणेच्या गैरवापर होत आहे. माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वेळीच निर्णय न दिल्याने महाराष्ट्रात नेमके काय घडले याचा शोध घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.

ईव्हीएम मशीनमध्ये गडबडीच्या ४५० तक्रारी

निवडणुकीत जय-पराजय ठरलेला. मात्र २०२४ च्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. भाजपला १३३ जागा मिळणे यात काहीतरी गडबड आहे. नाशिकमध्ये एका कुटुंबात ६५ मतदार असताना उमेदवाराला फक्त ४ मते कशी मिळाली. त्यामुळे ईव्हीएम मशीनमध्ये गडबड आहे. ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाल्याच्या ४५० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे ईव्हीएम मशीनमध्ये गडबड हे तर निश्चित आहे, असे राऊत म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in