शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनात सहानुभूती - छगन भुजबळ

एका कुटुंबात ऐवढ्या वर्ष एकत्र राहिल्यानंतर बारामतीत जे सुरू आहे. हे मला आणि काही लोकांना योग्य वाटत नाही. यात कोणाची चूक आहे, तो भाग वेगळा आहे. पण हे घडले नसते तर बरे झाले असते, असे मला वाटते, अशी भावनिक प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी बारामतीतील निवडणुकीवर दिली आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनात सहानुभूती - छगन भुजबळ

मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल जनतेच्या मनात सहानुभूती आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. 'अब की बार ४०० पार'चा भाजपच्या नाऱ्यामुळे राज्यघटनेत बदल करण्याची भीती जनतेच्या मनात असल्याचे देखील छगन भुजबळ यांनी एनडीटीव्ही या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघामुळे लोकसभा निवडणुकीत एडीएला किती नुकसान होईल का? या प्रश्नावर भुजबळ म्हणाले, "ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या रॅली होत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांत फूट पडल्यानंतर लोकामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांबद्दल सहानुभूतीची लाट आहे. आता त्यांच्या रॅलीला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, असे भुजबळ म्हणाले. तसेच देशात पुन्हा मोदींचे मजबूत सरकार यावे, अशी लोकांची इच्छा असल्याचेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

आमचे सरकार आल्यानंतर राज्यघटना बदलणार आहोत, असे विधान कर्नाटकातील भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केले होते आणि विरोधकांनी देखील भाजपचा 'अब की बार ४०० पार' हा नारा फक्त राज्यघटनेत बदल करण्यासाठी आहे, असा प्रचार करत आहेत. त्यामुळे लोकांना वाटू लागले की, 'अब की बार ४०० पार' फक्त राज्यघटनेत बदल करण्यासाठी आहे. परंतु, आपली राज्यघटना ही ऐवढी मजबूत आहे की, स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील आता बदलू शकत नाही, असे पंतप्रधान मोदी वारंवार जनतेला सांगत आहेत. पण, विरोधकांच्या प्रचाराचा कितपत परिणाम लोकांवर झाला आहे. हे आपल्याला मतपेट्या उघडल्यानंतरच कळेल, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी 'अब की बार ४०० पार'चा नारा हा राज्यघटना दुरुस्तीसाठी दिला जात आहे, या प्रश्नावर दिली आहे.

बारामतीबाबत भुजबळ यांची भावनिक प्रतिक्रिया

बारामतीत पवार कुटुंबातील नणंद आणि भावजय एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत? हा प्रश्न विचारल्यावर भुजबळ म्हणाले, माझ्यासाठी ही दु:खद गोष्ट आहे. एका कुटुंबात ऐवढ्या वर्ष एकत्र राहिल्यानंतर हे जे सुरू आहे. हे मला आणि काही लोकांना योग्य वाटत नाही. यात कोणाची चूक आहे, तो भाग वेगळा आहे. पण हे घडले नसते तर बरे झाले असते, असे मला वाटते, अशी भावनिक प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in