

मुंबई : राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यावर येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूट येथे सोमवारी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. विख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मंत्री भुजबळ यांना २८ ऑक्टोबर रोजी रुटीन तपासणीसाठी जसलोक रुग्णालयात दाखल केले. मात्र सोमवार मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूट येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला त्यांना दिला आहे.