लहान समाजात जन्मलो हे पाप आहे का?भुजबळांचा उद्विग्न सवाल; लातूरच्या कराड कुटुंबियांची सांत्वनपर भेट, मुंडेही उपस्थित

ओबीसी आरक्षण मुद्यावरून लातूरमधल्या भरत कराड नामक ३५ वर्षांच्या तरुणाने आयुष्य संपवले. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कराड कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना भुजबळ आक्रमक झाले.
लहान समाजात जन्मलो हे पाप आहे का?भुजबळांचा उद्विग्न सवाल; लातूरच्या कराड कुटुंबियांची सांत्वनपर भेट, मुंडेही उपस्थित
Published on

लातूर : ओबीसी आरक्षण मुद्यावरून लातूरमधल्या भरत कराड नामक ३५ वर्षांच्या तरुणाने आयुष्य संपवले. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कराड कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना भुजबळ आक्रमक झाले. आमच्या आरक्षणात अतिक्रमण नको, आमचे आरक्षण हिरावू नका, एवढीच मागणी आहे. लहान समाजात जन्मलो हे पाप आहे का, असा सवाल विचारत भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास कडाडून विरोध दर्शवला.

भुजबळ म्हणाले, याआधी आरक्षण मिफवण्यासाठी आजपर्यंत अनेकांनी लढा दिला आहे. बऱ्याच जणांनी प्राणांचे बलिदान दिलले आहे. आमच्यावर अतिक्रमण करू नका, आमचे आरक्षण हिरावून घेऊ नका, एवढेच आम्ही मागतो आहोत. आमच्यातूनच आरक्षण मागत आहेत. आम्ही काय पाप केले का ? लहान समाजात जन्म झाला हे आमचे पाप आहे का ? आमच्या लेकराबाळांनी शिकायचं नाही ? नोकऱ्या घ्यायच्या नाहीत का ? असा सवाल भुजबळांनी विचारला. 

.. आणि भुजबळ देखील गहिवरले !

दरम्यान, भरत कराड यांच्या कुटुंबाला भेट देताना आणि त्यांच्या मुलांना मांडीवर घेताना भुजबळांना एकाएकी गलबलून आले. त्यांचा देह थरथरला. घरातील महिला रडू लागल्या. मुले कावरीबावरी झाली आणि भुजबळांनी त्यांना जवळ धरले. त्यावेळी त्यांनाही रडू अनावर झाले. आपल्या रुमालाने त्यांनी मुलांचे डोळे पुसले. ओबीसी लढ्यात आज राग नव्हता. तर हळहळ होती. ओबीसी आरक्षण बचाव लढ्यात आजच्या चित्राने भुजबळ भावनिक झाले.

logo
marathi.freepressjournal.in