
नागपूर : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष मेळाव्याला ते उपस्थित नसल्याने या चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवारांकडून ऐनवेळी धनंजय मुंडे यांना संधी देण्यात आली. त्यामुळे भुजबळ यांचे नाव मागे पडल्याचे समजते. दरम्यान, नागपूर येथील देशपांडे हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. सर्व आमदारांना या ठिकाणी बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमाला अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह सर्वच आमदार उपस्थित होते. मात्र, छगन भुजबळ गैरहजर राहिल्याने ते नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले.