भुजबळांविरुद्ध एकवटू लागली मराठा समाजाची ताकद, अपक्ष उमेदवाराला देणार पाठिंबा

मराठा समाजातील मुलांच्या तोंडचा घास काढून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या भुजबळांविरोधात मराठा उमेदवार द्यावा, भुजबळांना गाडण्यासाठी समाजाने एकजूट करावी, असा मनसुबा यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
भुजबळांविरुद्ध एकवटू लागली मराठा समाजाची ताकद, अपक्ष उमेदवाराला देणार पाठिंबा

नाशिक : लोकसभा निवडणुकीतील संग्रामात नाशिक मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार यासंबंधात महायुतीमध्ये चांगलीच ओढाताण होत असतानाच आता महाराष्ट्राचे मंंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या नावाला हिरवा कंदील दिला गेल्याची चर्चा आहे. मात्र यामुळेच आता सकल मराठा समाजाने तेथे अपक्ष उमेदवार उभा करून त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर या संबंधातील अहवाल मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांना पाठवला जाणार आहे. यामुळे मराठा समाज भुजबळांच्या उमेदवारीविरोधात शड्डू ठोकून उतरणार असल्याचे चित्र दिसत आहेत.

भुजबळांविरोधातील मराठा समाजाने व्यक्त केलेल्या संतापाचा सूर नाशिकला नांदूरनाका परिसरात झालेल्या सकल मराठा समाजाची बैठकीत उमटला होता. त्यात मराठा समाजातील मुलांच्या तोंडचा घास काढून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या भुजबळांविरोधात मराठा उमेदवार द्यावा, भुजबळांना गाडण्यासाठी समाजाने एकजूट करावी, असा मनसुबा यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

डॉ. सचिन देवरे, विलास पांगारकर, चंद्रकांत बनकर, करण गायकर यांची नावेही अपक्ष उमेदवार म्हणून मराठा समाजाकडून सुचविण्यात येत असून लवकरच नाशिकसह दिंडोरी परिसरातील मराठा समाजाच्या होणाऱ्या बैठकीत या नावावर एकमत होऊ शकेल, त्या संबंधात निर्णय घेता येऊ शकेल व त्याचा अहवाल जरांगे-पाटील यांना दिला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

नाशिकच्या या जागेसाठी भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाकडूनही दावा करण्यात आला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनीही काही दिवसांपूर्वी हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केली. मात्र भाजपने श्रीकांत शिंदेंच्या घोषणेचा विरोध केला. आता हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असून तेथे छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळेच मराठा समाज याठिकाणी एकवटण्याची स्थितीही निर्माण झाली आहे.

भुजबळांविरोधात उमटला संतापाचा सूर

नाशिकला नांदूरनाका परिसरात झालेल्या सकल मराठा समाजाची बैठकीत उमटला होता. त्यात मराठा समाजातील मुलांच्या तोंडचा घास काढून घेण्याचा प्रत्न करणाऱ्या भुजबळांविरोधात मराठा उमेदवार द्यावा. भुजबळांना गाडण्यासाठी समाजाने एकजूट करावी, असा मनसुबा यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in