
सुजीत ताजणे / छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात यंदा दोन महिलांना शिवसेना आणि भाजपच्या वतीने संधी देण्यात आली होती. या संधीचे सोने करीत दोन्ही महिलांनी यश प्राप्त केले. तेजस्विनी जाधव यांच्यानंतर तब्बल ३० वर्षांनंतर जिल्ह्याला संजना जाधव, व अनुराधा चव्हाण या दोन महिला आमदार मिळाल्या आहेत.
कन्नडचे तत्कालीन आमदार रायभान जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी तेजस्विनी जाधव यांना संधी देण्यात आली होती. या निवडणुकीत जिल्ह्याच्या पहिला महिला आमदार होण्याचा बहुमान तेजस्विनी जाधव यांना मिळाला होता. परंतु, १९९० नंतर एकदाही जिल्ह्यात महिला आमदार मिळाल्या नाहीत. सलग ३० वर्षांनंतर २०२४ मध्ये कन्नड तालुक्यातून संजना जाधव, तर फुलंब्रीतून अनुराधा चव्हाण या दोन महिला आमदार मिळाल्या आहेत. जाधव आणि चव्हाण या पहिल्यांदाच निवडणुकीस उभ्या होत्या. जाधव यांच्याविरोधात त्यांचे पती हर्षवर्धन जाधव आणि विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत हे निवडणुकीच्या रिंगणात होते, तर जाधव यांच्याविरोधात मातब्बर विलास औताडे रिंगणात होते. या सर्वांवर मात करीत दोन्ही महिला आमदारांचा दणदणीत विजय झाला.
भाजपचा गड असलेल्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये या वेळी महायुतीकडून अनुराधा चव्हाण याना उमेदवारी मिळाली. या विश्वासाला खरे ठरवत चव्हाण यांनी विजय खेचून आणला. काँग्रेसकडून विजय औताडे आणि शिंदे सेनेचे बंडखोर रमेश पवार यांच्यामध्ये तगडी फाइट होईल अशी शक्यता होती. होताच परंतु, सकाळी मतमोजणी सुरू पहिल्याच फेरीमध्ये चव्हाण यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत राखत विजय मिळवला. जिल्ह्यात यंदा दोन महिलांना शिवसेना आणि भाजपच्या वतीने संधी देण्यात आली होती. या संधीचे सोने करीत दोन्ही महिलांनी यश प्राप्त केले. तेजस्विनी जाधव यांच्यानंतर तब्बल ३० वर्षांनंतर जिल्ह्याला संजना जाधव, व अनुराधा चव्हाण या दोन महिला आमदार मिळाल्या आहेत.
कन्नडचे तत्कालीन आमदार रायभान जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी तेजस्विनी जाधव यांना संधी देण्यात आली होती. या निवडणुकीत जिल्ह्याच्या पहिला महिला आमदार होण्याचा बहुमान तेजस्विनी जाधव यांना मिळाला होता. परंतु, १९९० नंतर एकदाही जिल्ह्यात महिला आमदार मिळाल्या नाहीत. सलग ३० वर्षांनंतर २०२४ मध्ये कन्नड तालुक्यातून संजना जाधव, तर फुलंब्रीतून अनुराधा चव्हाण या दोन महिला आमदार मिळाल्या आहेत.
जाधव आणि चव्हाण या पहिल्यांदाच निवडणुकीस उभ्या होत्या. जाधव यांच्याविरोधात त्यांचे पती मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून अनुराधा चव्हाण राहिल्या.
हर्षवर्धन जाधव आणि विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत हे निवडणुकीच्या रिंगणात होते, तर जाधव यांच्याविरोधात मातब्बर विलास औताडे रिंगणात होते. या सर्वांवर मात करीत दोन्ही महिला आमदारांचा दणदणीत विजय झाला.
सुरुवातीपासूनच आघाडी
भाजपचा गड असलेल्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये या वेळी महायुतीकडून अनुराधा चव्हाण याना उमेदवारी मिळाली. या विश्वासाला खरे ठरवत चव्हाण यांनी विजय खेचून आणला. काँग्रेसकडून विजय औताडे आणि शिंदेसेनेचे बंडखोर रमेश पवार यांच्यामध्ये तगडी फाइट होईल, अशी शक्यता होती. होताच परंतु, सकाळी मतमोजणी सुरू पहिल्याच फेरीमध्ये चव्हाण यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत राखत विजय मिळवला.