Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीत वाढ

मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणातील पुतळ्याचा शिल्पकार आरोपी जयदीप आपटे याच्या पोलीस कोठडीत १३ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे, तर बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीत वाढ
Published on

मालवण : मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणातील पुतळ्याचा शिल्पकार आरोपी जयदीप आपटे याच्या पोलीस कोठडीत १३ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे, तर बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पाटील याची सावंतवाडी कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे.

पुतळा कोसळल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे, तांत्रिक सल्लागार चेतन पाटील या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर डॉ. चेतन पाटील याला अटक करून पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर आपटे याला अटक केल्यावर या दोघांनाही १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्याने दोघांनाही कडेकोट पोलीस बंदोबस्तात पुन्हा मालवण न्यायालयात हजर करण्यात आले. मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याची चौकशी करायची असल्याने सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षाने न्यायालयात केली. त्यानुसार न्यायाधीश एम. आर. देवकाते यांनी आपटे याला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तर चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

logo
marathi.freepressjournal.in