राज्यपाल कोश्यारीचं शिवाजी महाराजांबद्दलच 'हे' विधान पडणार महागात ?

सार्वजनिक ठिकाणी एखाद लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील असं वक्तव्य करायचं आणि मग सारवासारव करायची याची जणू त्यांना सवयच
राज्यपाल कोश्यारीचं शिवाजी महाराजांबद्दलच 'हे' विधान पडणार महागात ?
Published on

राज्यपाल कोश्यारी आणि वाद हे समीकरण ठरलेलंच आहे. सार्वजनिक ठिकाणी एखाद लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील असं वक्तव्य करायचं आणि मग सारवासारव करायची याची जणू त्यांना सवयच झाली आहे.

आता त्यांनी आज पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत, असे बोलत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी उपस्थित होते.

याआधी देखील राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावतील अशी वक्तव्य वारंवार केली आहेत. राज्यपालाच्या या नवीन वक्तव्याचे आता काय पडसाद उमटणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in