छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याने महाराष्ट्रात हे सरकार पुन्हा मिळवले -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं
छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याने महाराष्ट्रात हे सरकार पुन्हा मिळवले -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गेली अडीच वर्ष ही अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार, अत्याचाराची गेली. राज्यात प्रशासन नावाची गोष्ट नव्हती. अनेक राजे काम करत होते. कोण राज्य चालवतंय ते समजत नव्हतं. सामान्य माणसाचं कुणी ऐकायला तयार नव्हतं. आपण छत्रपती शिवरायांचे वंशज आहोत. ते आपले आराध्य दैवत आहेत. छत्रपतींनी जो गनिमी कावा आपल्याला सांगितला, त्याच गनिमी काव्यानं आणि छत्रपतींसारखं निधड्या छातीनं महाराष्ट्रात हे सरकार पुन्हा एकदा आलं”,  असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं असून आता नेमकं काय आणि कसं घडलं? यावर राजकीय विश्लेषक खल करू लागले आहेत.विशेषत: १०६ आमदारांचा पाठिंबा असूनही देवेंद्र फडणवीसांनी ४० आमदारांसोबत आलेल्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊ केलं आणि स्वत: उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मंत्रिमंडळात जाणार नसल्याचं सांगूनही अर्ध्या तासात फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपद कसं स्वीकारलं? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच त्याविषयी खुलासा केला आहे.

 “अडीच वर्षापूर्वी २०१९ला महाराष्ट्रात तुम्ही भाजपा-शिवसेनेचं सरकार आणलं. पण आपल्याशी बेइमानी झाली. आपल्या पाठीत खंजीर खुपसला गेला. आपलं बहुमत पळवलं गेलं. जनतेचा कौल चोरी गेला. पण तो चोरी गेलेला कौल अडीच वर्षाची लढाई लढून आम्ही परत मिळवलाय. तुमच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा मोदींच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि भाजपा युतीचं सरकार नव्याने महाराष्ट्रात आपण आणलं आहे. एकनाथ शिंदे आपले मुख्यमंत्री आहेत. नागपूरचं एकनाथ शिंदेंचं स्वागत ठाणे-मुंबईलाही ऐकू गेलं पाहिजे”, असं  देवेंद्र  फडणवीस म्हणाले.

“काही लोक म्हणतात, हे सरकार ६ महिने चालेल. २०१४चं सरकार आल्यानंतर तेव्हाही हेच म्हणायचे की वर्षभराच्यावर सरकार चालणार नाही. पण ४० वर्षांनंतर पहिल्यांदा ५ वर्ष पूर्ण करणारा हा देवेंद्र फडणवीस होता. २०१४मध्ये महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचं सरकार आणल्याशिवाय राहणार नाही”, अशा शब्दांत फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in