छत्तीसगडमध्ये २१० नक्षलवाद्यांची शरणागती; संविधान हातात घेत पोलिसांसमोर शस्त्रे ठेवली

छत्तीसगडमधील बस्तरमध्ये सर्वात मोठे नक्षलवादी आत्मसमर्पण झाले आहे. शुक्रवारी तब्बल २१० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून हातात संविधान घेत त्यांनी पोलिसांसमोर शस्त्रे ठेवली. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये अनेक म्होरक्यांचा समावेश आहे.
छत्तीसगडमध्ये २१० नक्षलवाद्यांची शरणागती; संविधान हातात घेत पोलिसांसमोर शस्त्रे ठेवली
छत्तीसगडमध्ये २१० नक्षलवाद्यांची शरणागती; संविधान हातात घेत पोलिसांसमोर शस्त्रे ठेवली
Published on

बस्तर : छत्तीसगडमधील बस्तरमध्ये सर्वात मोठे नक्षलवादी आत्मसमर्पण झाले आहे. शुक्रवारी तब्बल २१० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून हातात संविधान घेत त्यांनी पोलिसांसमोर शस्त्रे ठेवली. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये अनेक म्होरक्यांचा समावेश आहे.

‘नक्षल निर्मूलन धोरण’अंतर्गत राज्य सरकारने आतापर्यंतचा सर्वात मोठा आत्मसमर्पण समारंभ आयोजित केला. मुख्यमंत्री विष्णुदेव साई म्हणाले, आजचा दिवस केवळ छत्तीसगडसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक क्षण आहे, कारण नक्षलवादी इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार सोडून संविधान आणि विकासाच्या मार्गावर परतत आहेत.

रिझर्व्ह पोलीस लाइन्स येथे आयोजित समारंभात सुमारे २१० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. नक्षलवाद्यांकडून एकूण १५३ शस्त्रे जप्त करण्यात आली. त्यात एके-४७, एसएलआर, आयएनएसएएस रायफल, एलएमजी, ३०३ रायफल, कार्बाइन, पिस्तूल आणि बीजीएल लाँचर्स यांचा समावेश आहे. शरणागतीपूर्वी नक्षलवाद्यांनी परेड आयोजित केली आणि संविधानाच्या प्रती हातात घेतल्या. मुख्य समारंभातही त्यांनी हातात संविधान धरले. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये ११० महिला आणि ९८ पुरुष नक्षलवादी आहेत.

शपथ घेतली

आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी अबुझमाड परिसरातून जगदलपूरमध्ये आले. समारंभात या नक्षलवाद्यांनी हातात भारतीय संविधान धरून पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर हिंसाचाराचा त्याग करण्याची शपथ घेतली. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या पुनर्वसनाचा भाग म्हणून त्यांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.

logo
marathi.freepressjournal.in