कामगार नेते डॉ. दत्ता सामंत हत्ये प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची निर्दोष मुक्तता

छोटा राजन याच्या विरोधात सरकारी वकिलांना कोणतेही सबळ पुरावे सादर करता आले नाहीत, त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे.
कामगार नेते डॉ. दत्ता सामंत हत्ये प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची निर्दोष मुक्तता
Published on

कामगार नेते दत्ता सामंत यांच्या २६ वर्षापूर्वी झालेल्या खूर प्रकरणात प्रमुख आरोपी असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सबळ पुराव्या अभावी विशेष सीबीआय कोर्टानं शुक्रवारी राजनची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. छोटा राजन याच्या विरोधात सरकारी वकिलांना कोणतेही सबळ पुरावे सादर करता आले नाहीत, त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे.

फिर्यादीच्या सांगण्यानुसार ४ अनोखळी व्यक्ती दुचाकीवरुन आले त्यांनी दत्ता सामंत यांची गाडी अडवली. यानंतर त्यांनी त्यांच्यावर १७ गोळ्या झाडल्या. आणि त्या ठिकाणाहून पळ काढला. यानंतर सामंत यांना नजिकच्या अनिकेत नर्सिंग होममध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केलं. मुंबईच्या साकीनाका परिसरात हा गुन्हा घडला होता. डॉ. दत्ता सामंत यांचे ड्रायव्हर भीमराव सोनकांबळे यांच्या फिर्यादीवरुन चार अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात सामंत यांच्या ड्रायव्हला देखील तोंडावर आणि मानेवर गंभीर दुखापत झाली होती.

छोटा राजनला २०१५ च्या ऑक्टोंबर महिन्यात इंडोनेशियाच्या बालीमधून अटक करण्यात आली. यानंतर सीबीआयने त्याचा ताबा घेत त्याच्यावर डॉ. दत्ता सामंत यांच्या खूनाचा खटला चालवण्यात आला होता.

logo
marathi.freepressjournal.in