मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा औरंगाबाद दौऱ्यावर ;

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहुप्रतिक्षित अश्वारूढ पुतळ्याचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा औरंगाबाद दौऱ्यावर ;
ANI

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा आज आणि उद्या असा दोन दिवसांचा असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहुप्रतिक्षित अश्वारूढ पुतळ्याचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होणार आहे. विविध कारणांमुळे हा प्रकल्प रखडला होता.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा बसवण्यात आला आहे. 35 फूट उंचीवर उभा असलेला हा पुतळा 11 फूट उंच आहे. या पुतळ्यासाठी 35 लाख रुपये खर्च करण्यात आले असून खुलताबाद येथील शतकुंडा स्टुडिओमध्ये ही ब्राँझची मूर्ती बनवण्यात आली आहे. या पुतळ्याचे आज सायंकाळी चार वाजता अनावरण होणार आहे, मात्र त्यापूर्वीच या पुतळ्याच्या अनावरणावरून वाद सुरू झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षनेते आणि विद्यार्थी संघटनांना निमंत्रण न दिल्याने वाद सुरू झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in