शिंदे सेनेची आठ जणांची पहिली यादी जाहीर

कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचेही नाव पहिल्या यादीत नाही. यवतमाळ-वाशिमच्या भावना गवळी यांचेही नाव पहिल्या यादीत नाही.
शिंदे सेनेची आठ जणांची पहिली यादी जाहीर

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने पहिली उमेदवार यादी गुरुवारी जाहीर केली. पहिल्या यादीत ८ जणांचा समावेश आहे. मुंबई दक्षिण-मध्य मधून राहुल शेवाळे, कोल्हापूरमधून संजय मंडलिक यांच्यासह आठ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, यामध्ये ठाणे आणि नाशिकमधील उमेदवार अद्याप घोषित करण्यात आले नाहीत. ठाण्यावर भाजपने तर नाशिकवर राष्ट्रवादीने दावा केल्याचे समजते. तसेच कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचेही नाव पहिल्या यादीत नाही. यवतमाळ-वाशिमच्या भावना गवळी यांचेही नाव पहिल्या यादीत नाही.

भाजपने याआधीच २४ उमेदवार जाहीर केले आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने २ उमेदवार जाहीर केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची गुरुवारी पहिलीच उमेदवार यादी जाहीर झाली. नाशिकमध्ये हेमंत गोडसेंच्या नावाला भाजपचा विरोध असून अजितदादांच्या राष्ट्रवादीलाही नाशिक हवे आहे. तिथे छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. ठाणे हा तर शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. तिथेही भाजपने दावा केला आहे, मात्र शिंदे गट ठाणे सोडण्यास अजिबात तयार नाही.

यवतमाळ वाशिमच्या जागेवरही तिढा आहे. पाच वेळा खासदार असलेल्या भावना गवळी यांचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही. मनसेला महायुतीत घेण्याची चर्चा सुरू आहे. मनसेला शिर्डी मतदारसंघ सुटेल, अशी चर्चा होती. मात्र या ठिकाणी शिंदे सेनेकडून सदाशिव लोखंडे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट लढत

  • दक्षिण-मध्य मुंबई - अनिल देसाई -राहुल शेवाळे

  • शिर्डी - भाऊसाहेब वाकचौरे - सदाशिव लोखंडे

  • बुलढाणा - नरेंद्र खेडेकर - प्रतापराव जाधव

  • हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर - हेमंत पाटील

  • मावळ - संजोग वाघेरे - श्रीरंग बारणे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in