पक्ष कोणाची खासगी मालमत्ता नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पक्ष कोणाची खासगी मालमत्ता नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एकाधिकारशाही, घराणेशाही, मक्तेदारी यांना चपराक मिळाली आहे. त्यांचा पराभव झाला असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुंबई : अखेर सत्याचा विजय झाला. लोकशाही आणि हिंदुत्वाचा विजय झाला. पक्ष कोणाची खासगी मालमत्ता नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. एकाधिकारशाही, घराणेशाही, मक्तेदारी यांना चपराक मिळाली आहे. त्यांचा पराभव झाला असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

लोकशाहीमध्ये कोणालाही पक्ष संघटना मालमत्ता मानून मनमानी निर्णय घेता येणार नाही, हे सिद्ध झाले आहे. भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद म्हणून तसेच शिवसेना खरी कोणाची यावरही आता शिक्कामोर्तब झाले आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे, यापुढे अशा प्रकारची मनमानी कोणाला करता येणार नाही हे सिद्ध झालं असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी मॅच फिक्सिंग असल्याच निकालावर म्हटलय. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, निकाल बाजूने लागला, तर मॅच फिक्सिंग नाही आणि मेरीटवर निकाल येतो तेव्हा मॅच फिक्सिंग. निकाल विरोधात गेला, तर ते निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टाला सल्ला देतात. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. लग्न एकाबरोबर आणि संसार दुसऱ्याबरोबर २०१९ मध्ये जनतेने शिवसेना-भाजपा युती म्हणून निवडून दिलं होतं याची आठवणही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करुन दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in