मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; म्हणाले, "जर मुख्यमंत्री अपॉइंटमेंटशिवाय भेटू शकतो तर..."

हे सरकार घरी बसणारं नाही, असं म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला देखील लगावला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; म्हणाले, "जर मुख्यमंत्री अपॉइंटमेंटशिवाय भेटू शकतो तर..."

जर मु्ख्यमंत्री कोणत्याही अपॉइंटमेंटशिवाय भेटू शकतात. तर जिल्हाधिकारी देखील कोणत्याही अपॉइंटमेंटशिवाय भेटूच शकतात, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री सध्या कोकणच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. नागरिकांना अत्यावश्यक सेवांसाठी कोणत्याही अपॉइंटमेंटशिवाय भेटण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

कोकणात सरकारने ठरवल्याप्रमाणे सर्व कामं केली आहेत. कारण आम्ही दिलेला शब्द पाळतो. मी आजवर भरपूर कागदारव सह्या केल्यात. गुवाहाटीवरुन फोन करुन मी अनेक कामं केली आहेत. सर्व कामं व्हायला हवेत ही एकच माजी इच्छा होती, असं देखील ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मी लोकांमधला माणूस आहे. मुख्यमंत्री सर्वसामान्य असेल तर अशी कामं होतात. मी राज्याच्या जनतेशी बांधील आहे. त्यामुळे जर मुख्यमंत्री वेळ न देता भेटू शकतो तर जिल्हाधिकाऱ्यांनी भेटलच पाहिजे, असं ते म्हणाले. तसंच हे सरकार घरी बसणारं नाही, असं म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला देखील लगावला.

logo
marathi.freepressjournal.in