मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं 'हे' ट्विट चर्चेत 

शिंदे यांनी ठाकरे सरकारचा खरपूस समाचार घेतला. या भाषणानंतर एका बैठकीदरम्यान शिंदे यांचा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं 'हे' ट्विट चर्चेत 
ANI
Published on

राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकारने बहुमत चाचणीमध्ये विजय मिळवल्यानंतर सभागृहातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण चांगलेच चर्चेत आले होते. या भाषणात शिंदे यांनी ठाकरे सरकारचा खरपूस समाचार घेतला. या भाषणानंतर एका बैठकीदरम्यान शिंदे यांचा रिक्षाचालक असा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला होता. यावर ठाकरे यांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी "रिक्षाच्या वेगाच्या तुलनेत मर्सिडीजचा वेग कमी झाला आहे कारण ते सामान्य माणसाचे सरकार आहे." असे ट्विट केले. उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात महिला मोर्चाची बैठक घेतली. या सभेत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता.

logo
marathi.freepressjournal.in