‘लाडकी बहीण’ सर्वात भारी…!

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून ६०० निर्णयाची चर्चाच नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिश्किल हसतच विरोधकांना टोला लगावला.
‘लाडकी बहीण’ सर्वात भारी…!
Published on

मुंबई : गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या हिताचे ६०० हून अधिक निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले गेले. मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून ६०० निर्णयाची चर्चाच नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिश्किल हसतच विरोधकांना टोला लगावला.

शांतीब्रह्म ह.भ.प. मारोती महाराज कुरेकर बाबा यांच्या ९३ व्या अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी तसेच वारकरी पूजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी आळंदी दौऱ्यावर आहे. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

माझ्या आयुष्यातील आजचा कार्यक्रम हा सर्वात आगळावेगळा आहे. वारकऱ्यांमध्ये येणे हे मी माझे भाग्य समजतो. त्याहून दुसरे पुण्य काहीच नाही. खरे म्हणजे आम्ही मुख्यमंत्री असलो किंवा सरकारमध्ये असलो तरी राजकीय अधिष्ठानापेक्षा तुमचे स्थान नक्कीच मोठे आहे. राजकीय मंडळीही आपल्यासमोर नतमस्तक होतात. कारण वारकरी एक अशी फॅक्ट्री आहे जिथे समाज तयार केला जातो. म्हणूनच आनंद दिघे नेहमी वारकरी संप्रदाय समूहात मला घेऊन यायचे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in