मुख्यमंत्री अचानक दिल्ली दौऱ्यावर ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

मुख्यमंत्री अचानक दिल्लीच्या दौऱ्यावर जाण्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत
मुख्यमंत्री अचानक दिल्ली दौऱ्यावर ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान
Published on

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठमोठे भूकंप होत आहेत. अशात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीकडे रवाना होणार असल्याने नेमकं चाललंय काय असा प्रश्न निर्माण होतं आहे. मुख्यमंत्री शिंदे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना होत असल्याचं सांगितलं जात आहे. रात्री नऊ वाजता ते दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यांचा हा दौरा पुर्वनियोजित नव्हता, त्यांच्या अचानक दिल्लीला जाण्याचं ठरल्याने चर्चांना उधान आलं आहे.

नुकतात अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या एका गटाने भाजपप्रणित शिंदे सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यामुळे शिंदे गटातील अनेक जण नाराज असल्याचं सांगितलं जात

होतं. काही नेत्यांनी तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावरुन पायउतार होऊन अजित पवार हे मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतील, असं सांगितलं जात होतं. अशात मुख्यमंत्र्यांच्या वारंवार दिल्लीवारीने, तसंच आज अचानकपणे दिल्लीच्या दौऱ्यावर जाण्याने अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in