
राज्यात सत्तांतर झाल्यापासून सतत दौऱ्यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवू लागला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने शिंदे यांनी त्यांचे सर्व प्रशासकीय आणि राजकीय कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस एकनाथ शिंदे कोणताही कार्यक्रम करणार नसून, या काळात ते सामान्य नागरिकांना भेटणार नसल्याचेही बोलले जात आहे. मात्र, ते मंत्रालय किंवा त्यांच्या निवासस्थानातून काम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे यांना थकवा जाणवत असला तरी काळजी करण्याचे कारण नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, डॉक्टरांनी शिंदे यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.