संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी सोडले मौन 

हा लढा सुरूच राहणार असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपची मोठी कोंडी
संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी सोडले मौन 

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात माजी मंत्री संजय राठोड यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व राजकीय स्तरांमधून राज्य सरकारला टीकेला सामोरे जावे लागत आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राठोड यांचे नाव वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या प्रकरणात राठोड यांना मंत्रिपद गमवावे लागले. मात्र आता पुन्हा राठोड यांना मंत्रिपद दिल्यानंतर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरले आहे. एवढेच नाही तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही आपल्याच सरकारवर टीका करत सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले. संजय राठोड विरुद्धची लढत संपलेली नाही. हा लढा सुरूच राहणार असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपची मोठी कोंडी झाली आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राठोड यांचे समर्थन करत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. आता काम सुरू होईल. सर्व मंत्री आपापल्या खात्याचा कार्यभार सांभाळतील. राज्यातील जनतेची काय अपेक्षा आहे. हे शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे. मागच्या सरकारमध्ये असतानाच राठोडांना क्लीन चिट देणारे पोलीस होते. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर कोणाला काही बोलायचे असेल तर आम्ही त्यांचेही नक्कीच ऐकू, असे शिंदे म्हणाले. त्यामुळे एकप्रकारे शिंदे यांनीही राठोड यांना पाठिंबा देत क्लीन चिट दिली आहे.

... तर अकेला बच्चू कडू काफी है

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून सरकारमध्ये समावेश झाल्याने बीडमधील राठोड समर्थकांनी जल्लोष केला आहे. शहरातील जय सेवालाल महाराज चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी संजय राठोड यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच बीडनंतर यवतमाळमध्ये जल्लोष झाला. राठोड यांच्या दारव्हा-दिग्रस मतदारसंघातील त्यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जमून जल्लोष केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in