
मुंबई : वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्सच्या (HSRP) शुल्काबाबत मुख्यंमंत्री फडणवीस यांना त्यांच्या अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली असल्याचा दावा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केला. तसेच महाराष्ट्र व गुजरात राज्यांमधील प्लेटससाठीची शुल्कात तफावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गुजरातमध्ये दुचाकीसाठी प्लेटसाठी १६० रुपये शुल्क आकारले जात आहे, पण महाराष्ट्रात त्याचे शुल्क ४५० रुपये आहे, असा दावा पवार यांनी केला.
सरकारने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी HSRPs अनिवार्य केले आहेत.विरोधी पक्षांनी या प्लेट्ससाठी जास्त शुल्क आकारले जात असल्याचा आरोप केला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी हा आरोप फेटाहून लावताना हे शुल्क इतर राज्यांच्या दरांशी जुळवले गेले आहेत, असे स्पष्ट केले होते.
पवार सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRPs) च्या शुल्काबाबत अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली आणि दावा केला की, गुजरातमधील ज्या कंपनीशी HSRP करार करण्यात आला आहे, ती कंपनी २००० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सामील आहे.
पवार यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य परिवहन बसांचा भाडेकरार, ठाणे क्रीक सौंदर्यीकरण प्रकल्प, शेती उत्पादन खरेदी, आणि बीएमसीमधील १,४०० कोटी रुपयांच्या निविदांवर स्थगिती का घातली, याचे स्पष्टीकरण द्यावे.