"लॉकडाऊन काळात राज्यात बालविवाह वाढले", राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा दावा

मोबाईलमुळे आई-वडील आणि मुलांमधाल संवाद संपला असल्याचं देखील त्या म्हणाल्या आहेत.
"लॉकडाऊन काळात राज्यात बालविवाह वाढले", राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा दावा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांनी केलेल्या एका नव्या दाव्याने नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. चाकणकर यांनी कोरोना काळात राज्यात बालविवाहांचं प्रमाण वाढल्याचा दावा केला आहे. लातूरमधली एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. यावेळी त्यांनी मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांचं अभ्यासावरुन लक्ष उडाल्याचं असल्याचं सांगत मोबाईलमुळे आई-वडील आणि मुलांमधाल संवाद संपला असल्याचं म्हटलं आहे.

रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्या

लातूरमधील एका कार्यक्रमात बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, "आई-वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये संवाद संपला आहे. यामुळेचं मुली प्रेमात पडून घरातून पळूनम जाऊ लागल्या आहेत. करोना काळात प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन लावण्यात आला होता. या काळात माहाराष्ट्रात बालविवाहांचं प्रमाण वाढलं."

याविषयी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, लातूर जिल्हा असा आहे जिथे ३७ वालविवाह रोखले गेले. महाराष्ट्रात बालविवाहांचं प्रमाण वाढलं आहे. मात्र, असं म्हणताना त्यांनी कुठलीही आकडेवारी सादर केली नाही. गावात ग्रामसभा घेतल्या जातात तेव्हा बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजनांवर चर्चा झाली पाहीजे. आई-वडील आणि मुलांमध्ये जो संवाद संपला आहे. त्यामुळे अनेदा मुली घर सोडून जात असल्याचंही समोर आलं आहे. असं चाकणकर म्हणाल्या

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in