पोटच्या मुलांनीच केला आई-वडिलांचा खून; जवळा मुरार येथील घटनेचा उलगडा

जवळा मुरार (ता.मुदखेड) येथे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा अखेर उलगडा झाला आहे. हा प्रकार घात आहे की आत्महत्या, याबाबत निर्माण झालेले गूढ बारड पोलिसांनी फोडले असून, पोटच्या दोन मुलांनीच आपल्या जन्मदात्या आई-वडिलांचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोटच्या मुलांनीच केला आई-वडिलांचा खून; जवळा मुरार येथील घटनेचा उलगडा
पोटच्या मुलांनीच केला आई-वडिलांचा खून; जवळा मुरार येथील घटनेचा उलगडाप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नांदेड : जवळा मुरार (ता.मुदखेड) येथे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा अखेर उलगडा झाला आहे. हा प्रकार घात आहे की आत्महत्या, याबाबत निर्माण झालेले गूढ बारड पोलिसांनी फोडले असून, पोटच्या दोन मुलांनीच आपल्या जन्मदात्या आई-वडिलांचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मुदखेड तालुक्यातील मुगट रेल्वेस्थानक परिसरात २५ डिसेंबर रोजी सकाळी उमेश रमेश लखे (२५) आणि बजरंग रमेश लखे (२२) या दोन तरुणांचे मृतदेह रेल्वेखाली आढळून आले होते. या दोघांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले होते.

दरम्यान, त्यांचे वडील रमेश होनाजी लखे (५५) आणि आई राधाबाई रमेश लखे (४८) यांचे मृतदेह जवळा मुरार येथील त्यांच्या घरात आढळून आले होते. ही घटना २४ डिसेंबरच्या मध्यरात्री घडल्याचे तपासात पुढे आले आहे. या घटनेनंतर मुदखेडसह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. हत्या की आत्महत्या, या प्रश्नावर तर्क-वितर्क सुरू होते.

गावातील व मुगट रेल्वेस्थानक परिसरातील प्रत्यक्षदर्शीची माहिती, घरातील पुरावे तसेच वैद्यकीय अहवालाच्या आधारे बारड पोलिसांनी तपास पूर्ण केला. तपासात असे निष्पन्न झाले की, बिकट आर्थिक परिस्थितीमुळे आलेल्या नैराश्यातून उमेश आणि बजरंग या दोघांनी मध्यरात्री आई-वडिलांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर दोघे दुचाकीवरून मुगट रेल्वेस्थानकात गेले आणि तेथे धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी बारड पोलीस ठाण्यात मयत दोन्ही मुलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मंठाळे यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in