अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा; मानधन व प्रोत्साहन भत्त्यापोटी १६३.४३ कोटी

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे डिसेंबर महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे डिसेंबर महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने मानधन व प्रोत्साहन भत्त्यापोटी १६३.४३ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे मानधन वेळेत देता यावे यासाठी अपर मुख्य सचिवांच्या (वित्त) अध्यक्षतेखाली २ जून २०१७ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची रक्कम केंद्रीय सहाय्य यांच्याकडून प्राप्त होत असली तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर २०२४ या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी एकूण १६३.४३ कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in