निवडणूक पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्या नाशकात; उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीस मार्गदर्शन करणार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपचा पाया मजबूत करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी ( दि. १० ) नाशिकमध्ये येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससंग्रहित छायाचित्र
Published on

नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपचा पाया मजबूत करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी ( दि. १० ) नाशिकमध्ये येणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी आणि शहर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांनी दिली. सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मुख्यमंत्री पंचवटीतील स्वामी नारायण मंदिरात प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांशी निवडणुकीबाबत चर्चा करणार आहेत.

मुख्यमंत्री घेणार आढावा

पुढील चार ते सहा महिन्यांच्या काळात महापालिका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, नगर पंचायती आदी निवडणुका पार पडणार आहेत. यासंदर्भात पक्षाची रणनीती, संघटन, राजकीय समीकरणे याचा मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. दुपारनंतर मुख्यमंत्री फडणवीस हे संभाजीनगरला रवाना होणार असल्याचेही सावजी आणि केदार यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in