Nashik : इगतपुरी जिंदाल कंपनी आग प्रकरण; मुख्यमंत्र्यांनी केली 'ही' महत्त्वाची घोषणा

इगतपुरीमधील (Nashik) जिंदाल कंपनीमध्ये लागलेल्या आगीमध्ये २ महिलांचा मृत्यू झाला तर १७ जण जखमी झाले
Nashik : इगतपुरी जिंदाल कंपनी आग प्रकरण; मुख्यमंत्र्यांनी केली 'ही' महत्त्वाची घोषणा
@ANI
Published on

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिंदाल कंपनीमध्ये आधी स्फोट आणि नंतर लागलेल्या आगीमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. नाशिकच्या (Nashik) इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावमध्ये असणाऱ्या जिंदाल कंपनीला मोठी आग लागली. यामध्ये आत्तापर्यंत २ महिलांचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी झाले आहेत. अद्यापही आग विझवण्याचे काम सुरु असून युद्ध पातळीवर हे काम सुरु आहे. अशामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची माहिती घेत मोठी घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत केली जाईल. तर जखमींवर योग्य उपचार होतील, त्याचबरोबर जखमींची सर्व खर्च सरकार करेल, असे आश्वासन दिले आहे. तसेच, या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले. औरंगाबाद येथे कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमात असलेले मुख्यमंत्री तात्काळ इगतपुरीला रवाना झाले. यावेळी त्यांनी जखमी रुग्णांची विचारपूसदेखील केली.

इगतपुरीमध्ये जिंदाल कंपनीला सकाळी आग लागली. मात्र, रात्र झाली तरी आग आटोक्यात आली नव्हती. तसेच, केमिकलचा साथ असल्याने अनेकदा स्फोटही झाले. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महा निरीक्षक बीजी शेखर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ महिलांचा मृत्यू झाला असून ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. तसेच, ९ जणांवर नाशिकच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

logo
marathi.freepressjournal.in