फ्रिजमध्ये भरलेले खोके कुठे गेले? याचा शोध घेतो आणि मग... ; मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार-खासदारांवर टीका केली होती. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशारा दिला
फ्रिजमध्ये भरलेले खोके कुठे गेले? याचा शोध घेतो आणि मग... ; मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलढाणामधील चिखली येथे झालेल्या जाहीर सभेत बंडखोर आमदार-खासदारांवर टीका केली. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिउत्तर देत म्हंटले की, फ्रीजमध्ये भरून कुठे खोके गेले? आता याचा मी शोध घेतो आणि नंतर त्याच्यावर बोलतो. असा सूचक इशारा दिला. उद्धव ठाकरे यांनी चिखली येथे बोलताना, 'जेव्हापासून खोके सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसलं तेव्हापासून पनवती सुरू झाली' अशी टीका करत म्हंटले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर बोलताना म्हंटले की, "मी जे करतो ते लपून छपून नाही करत, उघडपणे करतो. परंतु, लपून छपून केलेली कामे उजेडात येतात. आमच्यावर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावं. फ्रीजमध्ये भरून कुठे खोके गेले? आता याचा मी शोध घेतो आणि नंतर त्याच्यावर बोलतो." असा इशारा त्यांनी दिला आहे. पुढे त्यांनी म्हटले की, "संपूर्ण जगाला माहिती आहे आणि महाराष्ट्रालाही माहिती आहे. हे जे बोलत आहेत ते छोटे मोठे खोके आहेत. आमदारांच्या छोट्या-मोठ्या खोक्यांबद्दल काय बोलता? फ्रिजमधून खोके कुठे गेले, कंटेनरमधले खोके कुणाकडे जाऊ शकतात, हे समोर येईल."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in