"मी एकनाथ शिंदेंना उडवणार" अशी धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात; फोन करण्याचे कारण आले समोर

गेले काही दिवस राजकीय नेत्यांना धमक्यांचे फोन येण्याचे सत्र वाढले असून आता चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला
"मी एकनाथ शिंदेंना उडवणार" अशी धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात; फोन करण्याचे कारण आले समोर

सोमवारी रात्री ११२ या हेल्पलाईन नंबरवर, 'मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे' असा धमकीचा फोन आला आणि राज्यात एकच खळबळ उडाली. असा फोन करून आरोपीने फोन ठेवला आणि इकडे पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत फोन करण्याचा शोध सुरु केला. अखेर या फोन करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने असा फोन का केला? याचे कारणदेखील समोर आले आहे.

११२ या हेल्पलाईनवर मुख्यमंत्री शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन सोमवारी आला होता. यानंतर पोलिसांनी या फोनचा तपास केला आणि लोकेशन ट्रेस केल्यानंतर पुण्यातील वारजे येथील लोकेशन असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी येथून ४२ वर्षीय राजेश मारूती आगवने याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा नशेखोर असून त्याने नशेमध्ये असताना हा फोन केला होता. हा फोन करण्याआधी त्याने ऍम्बुलन्ससाठीदेखील फोन केला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय नेत्यांना येणाऱ्या धमकीच्या फोनचे प्रमाण वाढले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in