मुख्यमंत्री ३ दिवसांच्या सुट्टीवर? मुख्यमंत्री शिंदेंनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले, "मी सुट्टीवर नाही तर..."

गेले काही दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ३ दिवसांच्या सुट्टीवर गेले असल्याची चर्चा होती, विरोधकांनी यावरून त्यांच्यावर टीकादेखील केली
मुख्यमंत्री ३ दिवसांच्या सुट्टीवर? मुख्यमंत्री शिंदेंनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले, "मी सुट्टीवर नाही तर..."

गेले काही दिवस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ३ दिवसाच्या सुट्टीवर असल्याची चर्चा होती. विरोधकांनी त्यावरून मुख्यमंत्री शिंदेंवर टीकादेखील केली. यावर आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, "मी सुट्टीवर नाही तर, डबल ड्युटीवर आहे." असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विरोधांना उत्तरदेखील दिले असून ते म्हणाले की, "ते आरोप करतात कारण, सध्या त्यांच्याकडे काही काम शिल्लक राहिलेले नाही." असा टोला लगावला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "“मी सातारा दौऱ्यावर असून मी तापोळ्यातील पुलाची पाहणी केली आणि तापोळा महाबळेश्वर रस्त्याचे भूमिपूजनही केले. तसेच महाबळेश्वरमधील पर्यटनांच्या दृष्टीनेही आढावा बैठक घेतली. त्यामुळे मी सुट्टीवर वगैरे नाही. हे अगदी खोटे आहे. खरं तर मी सध्या डबल ड्युटीवर आहे." असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. विरोधकांच्या टीकेवर ते म्हणाले की, "माझ्यावर विरोधक आरोप करत आहेत, कारण त्यांच्याकडे काही काम उरलेले नाही. त्यांना माझ्यावर आरोप करण्याशिवाय दुसरे कोणतेही काम नाही. आम्ही त्यांना घरी बसवले असून ते आरोप करतच राहणार. पण, आम्ही त्यांना आरोपाचे उत्तर आरोपाने नाही, तर कामाने देऊ. मी साताऱ्यात येऊन आराम करत नसून कामच करत आहे."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in