पेट्रोल-डिझेलपेक्षा नागपुरात सीएनजी महागले

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच पेट्रोल डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा सल्ला नागरिकांना देत असतात.
पेट्रोल-डिझेलपेक्षा नागपुरात सीएनजी महागले

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे इंधनाचा स्वस्त पर्याय म्हणून सीएनजीकडे पाहिले जात होते. मात्र सीएनजीच्या दरातही झपाट्याने होणारी वाढ नागरिकांची चिंता वाढवत आहे. नागपुरात सीएनजी पेट्रोल-डिझेलपेक्षाही महाग विकले जात आहे. नागपूरमध्ये आजचासीएनजीचा दर हा ११६ रुपये प्रति किलो आहे. तर पेट्रोलचा दर हा १०६ रुपये ५ पैसे व डिझेलचा दर ९२ रुपये ६० पैसे आहे. देशातील सर्वात महाग सीएनजी हे नागपूरमध्ये ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे. मुंबईत सीएनजी ८० रुपये दराने विकले जात आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच पेट्रोल डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा सल्ला नागरिकांना देत असतात. मात्र त्यांच्याच नागपूरमध्ये सीएनजी दराचा उडाला भडका आहे. राज्यातील नाहीतर देशातील सर्वात महाग सीएनजी नागपुरात विकला जात आहे. तर राज्यातील सर्वात स्वस्त सीएनजी हे नाशिकमध्ये विकले जात आहे. नाशिकमध्ये सीएनजीचा दर ६७.९० रुपये आहे. महाराष्ट्रात सीएनजी सरासरी ८२.६० रुपायांना विकले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in