'कॉकरोच जनता पार्टी'ची प्रचंड क्रेझ; पण अभिजीत दिपके याच्या पालकांना अटकेची धास्ती

'कॉकरोच जनता पार्टी' या उपरोधात्मक डिजिटल प्लॅटफॉर्मने सोशल मीडियावर घेतलेल्या गरुडझेपेमुळे त्याचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या पालकांची झोप उडाली आहे.
'कॉकरोच जनता पार्टी'ची प्रचंड क्रेझ; पण अभिजीत दिपके याच्या पालकांना अटकेची धास्ती
'कॉकरोच जनता पार्टी'ची प्रचंड क्रेझ; पण अभिजीत दिपके याच्या पालकांना अटकेची धास्ती
Published on

छत्रपती संभाजीनगर : 'कॉकरोच जनता पार्टी' या उपरोधात्मक डिजिटल प्लॅटफॉर्मने सोशल मीडियावर घेतलेल्या गरुडझेपेमुळे त्याचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या पालकांची झोप उडाली आहे. आपला मुलगा एखाद्या संकटात सापडेल किंवा त्याला अटक होईल, या भीतीने त्याचे आई-वडील प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत.

अवघ्या आठवड्याभरापूर्वी बोस्टन युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी असलेल्या अभिजीत दिपके याने या प्लॅटफॉर्मची स्थापना केली होती. अल्पावधीतच याचे तब्बल १ कोटी ९० लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स झाले आहेत. अभिजीत पूर्वी आम आदमी पार्टीशी जोडलेला होता. छत्रपती संभाजीनगर येथे राहणारे अभिजीतचे वडील भगवान दिपके आणि आई अनिता दिपके यांनी गुरुवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या मुलाने राजकारणात पडावे अशी आपली अजिबात इच्छा नसल्याचे सांगत, अभिजितच्या या पावलामुळे आपली रात्रीची झोप उडाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

'कॉकरोच जनता पार्टी'ची प्रचंड क्रेझ; पण अभिजीत दिपके याच्या पालकांना अटकेची धास्ती
कॉकरोच जनता पार्टीचा सोशल मीडियात धुमाकूळ

पालकांना अटकेची भीती

"सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, त्याचे कितीही फॉलोअर्स असले तरी भीती वाटणे स्वाभाविक आहे. स्वतः अभिजीतनेही एका मुलाखतीत भारतात परत आल्यावर अटक होण्याची भीती व्यक्त केली होती. अशा घटना आपण रोज वृत्तपत्रात वाचतो, असे भगवान दिपके यांनी सांगितले. अभिजीतची आई अनिता दिपके यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाने राजकारणापासून दूर राहावे आणि नोकरीवर लक्ष केंद्रित करावे. आमची एवढीच इच्छा आहे की त्याने सुरक्षित घरी परतावे. पुढे काय करायचे हा त्याचा निर्णय असेल, पण आमचा याला पाठिंबा नाही. मला त्याची खूप काळजी वाटते.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी देशातील तरुणांना झुरळाची उपमा दिली होती. त्यामुळे देशात संतापाचे वातावरण पसरले होते. झेन झीच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी 'कॉकरोच जनता पार्टी' ची स्थापना झाली.

'कॉकरोच जनता पार्टी'ची प्रचंड क्रेझ; पण अभिजीत दिपके याच्या पालकांना अटकेची धास्ती
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा; NEET प्रश्नी ‘झुरळां’चा पहिला हल्ला

'कॉकरोच जनता पार्टी'ची स्थापना

अभिजीतच्या म्हणण्यानुसार, देशाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका वकिलाला फटकारताना वापरलेल्या शब्दांनंतर निर्माण झालेल्या वादातून 'कॉकरोच जनता पार्टी'चा जन्म झाला. ज्येष्ठ वकील पदाच्या नामांकनासाठी आलेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी 'परजीवी' आणि 'झुरळ' या शब्दांचा वापर केला होता. जरी नंतर सरन्यायाधीशांनी स्पष्टीकरण दिले की, त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून त्यांचे भाष्य केवळ 'बनावट आणि बोगस पदव्या' घेऊन वकिली व्यवसायात येणाऱ्या व्यक्तींबद्दल होते; तरीही सोशल मीडियावर 'झुरळ' हे चिन्ह वापरून पार्टीने धुमाकूळ घातला.

logo
marathi.freepressjournal.in