मतदान ओळखपत्र नसल्यास आधारकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट, पॅनकार्डदेखील पर्याय; रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती

काही मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसल्यास अथवा त्यांच्या ओळखपत्रामध्ये काही शुद्धलेखनाच्या चुका, छायाचित्र वगैरे जुळत नसल्यामुळे मतदाराची ओळख प्रस्थापित करणे शक्य नसल्यास मतदाराला भारत निवडणूक आयोगाने परिच्छेद ७ मध्ये नमूद केलेली ओळखपत्रं पर्याय असणार आहेत.
मतदान ओळखपत्र नसल्यास आधारकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट, पॅनकार्डदेखील पर्याय; रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती

रायगड : ज्या मतदारांकडे मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र नाही अथवा वेळेत मिळवू शकणार नाहीत, अशासाठी अन्य छायाचित्रासह असणारे ओळखपत्र पर्याय असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.

काही मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसल्यास अथवा त्यांच्या ओळखपत्रामध्ये काही शुद्धलेखनाच्या चुका, छायाचित्र वगैरे जुळत नसल्यामुळे मतदाराची ओळख प्रस्थापित करणे शक्य नसल्यास मतदाराला भारत निवडणूक आयोगाने परिच्छेद ७ मध्ये नमूद केलेली ओळखपत्रं पर्याय असणार आहेत.

यात आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक/पोस्ट ऑफीसने फोटोसह दिलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआयने दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तावेज, केंद्र/राज्य सरकार/पीएसयू/पब्लिक लिमिटेड कं. कर्मचाऱ्याने दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदार/एमएलसी यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण भारत सरकारतर्फे मिळालेली दिव्यांग आयडी कार्ड (यूडीआयडी) यांचा समावेश आहे.

यापैकी एक मतदान केंद्रावर सादर करणे हा मतदारांना पर्याय असला, तरी मतदारांनी मतदार ओळखपत्र तयार करून घेण्यास प्राधान्य द्यावे. लोकप्रतिनिधी कायदा १९५० च्या कलम २० ए अंतर्गत मतदार यादीत नोंदणी केलेले परदेशी मतदार त्यांच्या भारतीय पासपोर्टमधील तपशिलांच्या आधारे ओळखले जातील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in