महाविद्यालयीन तरुणांची फ्री स्टाईल तुंबळ: हाणामारी दोन गट एकमेकांना भिडले; चौघेजण पोलिसांच्या ताब्यात

दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस चौकशी करत विद्यार्थ्यांची धरपकड करत होते.
महाविद्यालयीन तरुणांची फ्री स्टाईल तुंबळ: हाणामारी दोन गट एकमेकांना भिडले; चौघेजण पोलिसांच्या ताब्यात

कराड : सातारा असो की कराड कॉलेज कुमारांमधील भांडणे, हाणामाऱ्या नित्याचा 'कॉमन' प्रकार झाला आहे. त्यामुळे ना कायद्याचा धाक ना शिक्षक, वडीलधाऱ्यांचा, त्यामुळेच शिक्षण घेण्यापेक्षा गुन्हेगारीकडे विद्यार्थ्यांच्या वाढत्या कलावरून सुज्ञ लोकांना चिंता वाटू लागली आहे. त्यातच काही महिन्यापूर्वी साताऱ्यातील एका महाविद्यालयाच्याविद्यार्थ्यांमध्ये हाणामारीची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा साताऱ्यातील त्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बुधवारी (२७ डिसेंबर) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.फ्री स्टाईल तुंबळ हाणामारी प्रकरणी पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस चौकशी करत विद्यार्थ्यांची धरपकड करत होते.

साताऱ्यातील जिल्हा न्यायालयाच्या मुख्य रस्त्यावर महाविद्यालयीन तरुणांचे दोन गट समोरासमोर येत एकमेकांना भिडले. त्यांनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली व जवळपास अर्धातास मारामारीच्या हा प्रकार चालला. यानंतर या घटनेची माहिती सातारा शहर पोलिसांना दिली असता शहर पोलिसांनी घटनास्थळी येत ४ तरुणांना ताब्यात घेतले असून पोलीस त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत.                  

बुधवारी दुपारी दीड वाजता साताऱ्यातील जिल्हा न्यायालयाच्या मुख्य रस्त्यावर, महाविद्यालय सुटल्यानंतर काही मुले चालत सहकार न्यायालयाच्या समोरील रस्त्यावरून जात होती. त्यावेळी काही तरुण पाठीमागून आली. त्यांनी पुढे गेलेल्या मुलांवर अचानक हल्ला केला. त्यानंतर दोन्ही गट एकमेकांना भिडले.महाविद्यालयीन तरुणांचे दोन गट समोरासमोर आले व त्यांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली.तरुणांच्या दोन्ही गटाचा भर रस्त्यातच मारामारीचा प्रकार सुरू होता. काहींनी त्यांच्या मारामारीच्या मध्यस्थीचा प्रयत्न केला पण वडीलधाऱ्यांचे ऐकतील ते कॉलेज कुमार कसले? त्यामुळे काहींनी या मारामारीची माहिती सातारा शहर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी आले. पोलिस आल्याचे समजताच काही तरुण पसार झाले तर चार तरुणांना ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू होती. कोणत्या कारणातून हा वाद झाला, हे अद्याप समोर आले नाही; मात्र सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी करून यातील विध्यार्थ्यांची धरपकड सुरू होती. याबाबतचा गुन्हा रात्री उशिरा दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in