तंजावर येथे १००व्या नाट्य संमेलनाचा प्रारंभ

१०० व्या मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ शाहराज राजे भोसले यांच्या वाङमयाला वंदन करून व नटराज पूजन करण्यात आले.
तंजावर येथे १००व्या नाट्य संमेलनाचा प्रारंभ
PM

तंजावर : नाटककार शहाजी (शाहराज) राजे भोसले हे मराठी रंगभूमीचे पहिले नाटककार असून, 'लक्ष्मी नारायण कल्याण' हे पहिले मराठी नाटक होय, असे उद्गार ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी, तंजावर येथील सरस्वती महालात संपन्न झालेल्या कार्यक्रमात काढले.

१०० व्या  मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ शाहराज राजे भोसले यांच्या वाङमयाला वंदन करून व नटराज पूजन करण्यात आले. त्यावेळी  नाटककार प्रेमानंद गज्वी बोलत होते. पुढे गज्वी म्हणाले, शाहराजांनी २२ मराठी,२० तेलगु, १ संस्कृत,१ तमिळ व ३ हिंदी नाटके लिहिली असून ते मराठी रंगभूमी बरोबरच तामिळ आणि हिंदी रंगभूमीचेही आद्य नाटककार होते. ते काव्य भाषा शास्त्राचे अभ्यासक होते. त्यांनी बारामास आणि षडरूतुवर्णन ही काव्ये लिहिली असून ते शूर, राजकारणपटू रसिक, कलाज्ञानी आणि नृत्य कलेचे मर्मज्ञ होते. असेही गज्वी म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नटराजाचे पूजन करून आणि शाहराजाचे वाङमयाला पुष्पांजली वाहून करण्यात आली.

यावेळी केलेल्या भाषणात शिवाजी राजे भोसले म्हणाले, "मी  व्यंकोजी राजघराण्यातील आठवा वारसदार आहे याचा मला मोठा अभिमान आहे. राजांच्या मुळेच मला सन्मान मिळत आला. १०० व्या नाट्य संमेलनाचे निमित्ताने, महाराष्ट्रातून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे पदाधिकारी इथं तंजावरला आले. ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी स्वत: शाहराजांना वंदन करायला इथं आले. नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके कार्यकारी समिती सदस्य गिरीश महाजन, नियामक मंडळ सदस्यआनंद कुलकर्णी तंजावर इथे आले याचा खूप आनंद झाला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तामिळ विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. तुरूवेल्लुवन, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी दीपक जेकब उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in