उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजीज शेख यांची ‘आयएएस’साठी निवड

सेवनिवृत्तीला अवघा एक आठवडा बाकी असतानाच यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख यांची आयएएससाठी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांना थेट दोन वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे.
उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त
अजीज शेख यांची ‘आयएएस’साठी निवड

उल्हासनगर : सेवनिवृत्तीला अवघा एक आठवडा बाकी असतानाच यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख यांची आयएएससाठी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांना थेट दोन वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे.

नोव्हेंबर २०२३ च्या पहिल्या आठवड्यात भारतीय प्रशासन सेवेत नियुक्तीसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन लेखी परीक्षेत उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजीज शेख यांनी बाजी मारली होती. शेख यांनी २८१ अधिकाऱ्यांमध्ये १३ वा क्रमांक पटकावल्याने ते दिल्ली येथे होणाऱ्या यूपीएससी बोर्डच्या परीक्षेसाठी पात्र ठरले होते.

२९ नोव्हेंबर २०२३ रोजी भारतीय प्रशासन सेवेच्या निवडीने नियुक्तीकरिता बिगर राज्य नागरी सेवेतील अधिकाऱ्यांची १०० गुणांची ऑनलाईन लेखी परीक्षा आय.बी.पी.एस. मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आली होती. सदर परीक्षेसाठी २८१ अधिकारी उपस्थित होते. या परीक्षेचा निकाल लागल्यावर त्यात ५१ गुण मिळवून आयुक्त अजीज शेख यांचा १३ वा क्रमांक मिळाला.

या परीक्षेत प्रथम २० मध्ये येणारे अधिकारी पुढील आठवड्यात दिल्ली होणाऱ्या यूपीएससी बोर्डच्या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यात अजीज शेख यांचाही समावेश होता. अजीज शेख हे १९९४ बॅचचे अधिकारी असून त्यांनी नागपूर, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई या महानगरपालिकेत उपायुक्त पदभार पाहिला आहे. काही वर्षांपूर्वी त्यांची पदोन्नती झाल्यावर त्यांची धुळे महानगपालिकेत आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली होती. अजीज शेख हे १३ जुलै २०२२ पासून उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तपदाचा पदभार हाताळत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in