अभ्यासक्रम, फी, शिक्षकांची माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक; राज्य सरकारचे कॉलेज, विद्यापीठांना आदेश

राज्य सरकारने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार, हे नियम जारी केले.
अभ्यासक्रम, फी, शिक्षकांची माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक; राज्य सरकारचे कॉलेज, विद्यापीठांना आदेश
महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे संग्रहित छायाचित्र

मुंबई : राज्यातील सर्व सरकारी, खासगी व अभिमत विद्यापीठांना त्यांची फी, शिक्षक, अभ्यासक्रम व त्यांच्याकडील सोयीसुविधांचा माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश राज्याच्या उच्च शिक्षण खात्याने दिले आहेत. प्रवेशापूर्वी ६० दिवस आधी ही माहिती वेबसाइटवर टाकायची आहे.

राज्य सरकारने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार, हे नियम जारी केले. शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी व राष्ट्रीय शिक्षण धोरणातील नियामक आराखड्यानुसार, हे पाऊल उचलले आहे.

शैक्षणिक संस्थांनी सर्व विषय, अभ्यासक्रमाची माहिती द्यायची आहे. तसेच शैक्षणिक वर्षासाठी उपलब्ध जागा, फी व अन्य शुल्क विद्यार्थ्यांना सांगायचे आहे. त्यांच्या शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या प्रत्येक शिक्षकाची शैक्षणिक पात्रता जाहीर करायची आहे. शैक्षणिक माहिती व अन्य सुविधा आदींची माहिती द्यायची आहे.

देशातील अनेक विद्यापीठांची विद्यापीठ अनुदान आयोगाने कानउघडणी केली. त्यात राज्यातील १७ विद्यापीठांचा समावेश आहे. कारण विद्यार्थ्यांच्या तक्रारीसाठी विद्यापीठांनी ‘अम्बुडसमन’ नेमला नाही. मुंबई विद्यापीठ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वगळता अन्य विद्यापीठे आयोगाच्या सर्व निकषांची पूर्णत: करण्यात अपयशी ठरले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in