सोडून गेलेल्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता - शरद पवार

प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यावर कारवाई करणार असल्याचंही पवार म्हणाले
सोडून गेलेल्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता - शरद पवार

अजित पवार यांनी 30 आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली. आज राजभवनावर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राष्ट्रवादीच्या महत्वाच्या आठ नेत्यांनी मंत्रपदाची शपथ घेतली. राजभवनावर हा शपथविथी सोहळा पार पडत असताना. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे आणि राष्ट्रवादीचे नवनिर्वाचीत कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती मी केली आहे. त्यांनी च्याची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नाही, असं सांगत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. तसंच सुनिल तटकरे यांनी देखील जबाबदारी पार पाडली नसून त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल. असं पवार म्हणाले. यावेळी त्यांनी मी पक्षाचा अध्यक्ष असून यापुढे पक्ष वाढवण्यासाठी दौरे करणार असल्याचही त्यांनी याववेळी सांगितलं.

राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतले नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत शपथ घेतली. यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, एकेकाळी माझ्यासोबत 56 आमदार होते. त्यापैकी 50 जण मला सोडून गेले. एका क्षणात मी फक्त सहा आमदारांचा नेता झालो. त्यानंतर मी महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचलो, माझी भूमिका मांडली. त्यानंतर झालेल्या निडणूकीत सोडून गेलेल्या आमदारांपैकी चार ते पाच जणचं निवडून आले, बाकीचे सगळे पडले. आताही मला सोडून गेलेल्यांची चिंता नाही. जे सोडून गेले त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता आहे, असं पवार यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in