दिव्यांगांच्या पालकांसाठी कार्यशाळा संपन्न

प्रिझम फौंडेशन व पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने दिव्यांगांच्या पालकांना विशेष मुलांसाठी मिळणाऱ्या सरकारी सोयी सुविधा व योजनांची माहिती देण्यासाठी कार्यशाळा
दिव्यांगांच्या पालकांसाठी कार्यशाळा संपन्न

विशेष मुलांच्या सर्वांगीन पुनर्वसनासाठी कार्यरत प्रिझम फौंडेशन व पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने दिव्यांगांच्या पालकांना विशेष मुलांसाठी मिळणाऱ्या सरकारी सोयी सुविधा व योजनांची माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे निवृत्त महाव्यवस्थापक नंदकुमार फुले, पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक अशोक सोळंके व रमेश मुसुडगे, विद्या भागवत मुख्याध्यापिका वेन्यू ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांचेसह दिव्यांगांचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेदरम्यान नंदकुमार फुले यांनी ऑटीझम, सेरेब्रल पाल्सी, मतिमंद तसेच बहुविकलांग दिव्यांगांसाठीच्या राष्ट्रीय न्यास अधिनियम 1999 या कायद्याची तसेच  कायदेशीर पालकत्वाची माहिती दिली. रमेश मुसुडगे यांनी निरामया आरोग्य विमा योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. अशोक सोळंके यांनी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या कार्यासंदर्भातील माहिती दिली यामध्ये युडीआयडी कार्ड, कृत्रिम अवयव व साधने याबाबत माहिती दिली. शेवटी उपस्थित पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची प्रमुख वक्त्यांनी उत्तरे दिली. विद्या भागवत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मानले.

logo
marathi.freepressjournal.in